अन तीव्र लहर वाऱ्याची छेडिता पारिजाताला,
शाल शुभ्र, खांद्यावरुनी, हळुवार ओघळत होती....
घनगर्द, सांवळ्या मेघां, बिजलीने कातरताना,
वेदनाच जणू मेघाची, जलरुपीं कोसळत होती.... सुंदर !