दोनांपैकी एका मेहुण्यासाठी आपल्याकडच्या कित्येक प्रांतामध्ये शाला,शाळा,शाळेभाऊ,साळा,साळाजी,साळेजी अशी नावे सर्रास प्रचलित आहेत.फक्त लिखित प्रमाण भाषेमध्ये हे शब्द नाहीत एव्हढेच काय ते. हिंदीमधे सालेजी, सालेसाहब हे प्रमाण शब्द मानले जातात. मूळ अर्थात श्यालक हा संस्कृत शब्द. प्रमाण भाषा एका ठराविक परिघात राहिली की कशी दुबळी होऊ लागते आणि शब्द सांडू लागते ,ते यावरून स्पष्ट व्हावे.