स्वतःच्या दुखऱ्या भागावर स्वतःच प्रहार करीत राहावे तसे त्याने मनाच्या कोपऱ्यात निगुतीने जपलेले ते मोरपिशी स्वप्न पुन्हा नजरेसमोर आणण्याचा यत्न केला. मोरपिसांचे डोळे क्षणभर झळाळून गेले, पूरियाची सुरावट कानांवर रेघोट्या ओढून गेली आणि पुन्हा सगळे मूक झाले.

"माझे लग्न ठरले आणि त्या फणसावर वीज कोसळली. त्याचे लाकूड नि कोळसा विकून माझ्या लग्नाच्या खर्चाची भर झाली.

"मी हौसेने रोपलेल्या प्राजक्तावर कीड पडली. दुधासारख्या शुभ्र चंपी कुत्रीला नाग चावला. आणि पार मिरजेवरून हौसेने मागवलेल्या तंबोऱ्यात विंचवाने घर केले.

एकापेक्षां एक अफलातून सूचक प्रतिमा कठोर वास्तव आणि दुर्दैवाचे फेरे अधोरेखित करीत जातात. फक्त ठाय लयींत सुरू झालेली कथा अचानक वळण घेऊन संपते. रंगांत आलेला सामना अचानक पावसानें बंद पडावा तसें काहींतरी झाल्यासारखें वाटलें.

सुधीर कांदळकर