यशवंतजी,
प्रतिसादाबद्दल आभार.
ह्या कवितेमुळे जर कोणालाही, म्हणजे मुलाला किंवा मुलीला जर फायदा झाला तर माझा जन्म सार्थकी लागला असेच म्हणेन.
ठाणे जिल्ह्यातील आग्री समाजात आजही बऱ्याचवेळा कमी वयात मुलींची लग्ने होतात. अशाच एका मुलीचा नवरा एका वर्षातच एडसने गेला.
एका तरुण, सुस्वरुप, माझ्या मुलीप्रमाणे असलेल्या त्या मुलीला जे भोगायला आले ते फारच भयंकर आहे.सविस्तर लिहायची ही जागा नाही.
पण फारच, फारच भावपूर्ण ह्या प्रतिसादामुळे मन भरून आले.
धन्यवाद.