संस्कृतमधल्या मिथुन म्हणजे जोडपे या शब्दावरून मराठीत मेहूण आला. पती-पत्‍नी या दोघांना जेवायचे आमंत्रण देणे म्हणजे मेहूण बोलावणे. या मेहूण शब्दापासून  पत्‍नीचा भाऊ आणि बहिणीचा पती यांना पुढे केव्हातरी  मेव्हणा म्हणायला लागले असले पाहिजेत. पत्‍नीच्या भावा-बहिणींना  हिंदीत साला-साली म्हणतात. मराठीत (आणि हिंदीतही) या शिव्या समज़ल्या गेल्यामुळे हे शब्द मराठीत आले नाहीत, हे उघड आहे. ठाकुराची धर्मपत्‍नी ठकुराइन, पंडिताची(ब्राह्मणाची) पंडिताइन, शुक्‍लाची शुक्‍लाइन, (पण कायस्थाची दुल्हन! ) या धर्तीवर साल्याच्या बायकोला हिंदीत सालन किंवा सलाइन म्हणायला हरकत नव्हती, पण तसे म्हणत असल्याचे ऐकिवात नाही. मराठीने तरी वेगळा शब्द का ठेवावा?

असे असले तरी, मराठीपेक्षा हिंदीत नातेसंबंधी शब्द अधिक स्पष्ट आहेत.  दादा-नाना, बहनोई-नन्दोई, मौसाजी-फ़ूफ़ाजी, नाती(=मुलाचा मुलगा), दोहित(=मुलीचा मुलगा), नातिन(=मुलीची मुलगी), (मुलाच्या मुलीला काय म्हणतात?) वगैरे, वगैरे.  इतके असून, बायकोला बहू म्हणायचे आणि सुनेलाही तेच.   इथे मात्र शब्दांची काटकसर. असे का हे कोडे कुणी उलगडेल का?--अद्वैतुल्लाखान