बंडी हा बहुधा तेलुगू शब्द असावा. विदर्भातला काही प्रदेश आंध्रप्रदेशाला जो‌‌डून आहे, म्हणून तिकडून हा गाडा अशा अर्थाचा शब्द, विदर्भात गेला असावा. मराठीत गाडी या अर्थाचे किती शब्द असावेत? गाडी, (अडतें तें किंवा ज्याला खीळ घालतात तें)गाडें, (मालवाहतुकीसाठी) गाडा, खटारा, बंडी, दोन बैलांची छोटी रिंगी/रेंगी, (मध्यम आकाराची) बैलगाडी, एका बैलाचा छकडा, एक्का, रेंकला,  वरती टप असलेली एका बैलाची धम(णी)नी, दमणी, सारवट, भुरकीगाडी इत्यादी. 
घोड्याची घोडागाडी, टांगा, तांगा,  चारचाकी बग्गी (बगी), दोन घोडे आणि चार चाकांची व्हिक्टोरिया, तसाच  रथ वगैरे.
या गाड्यांना आणखीही शब्द असतील. रेड्याच्या किंवा याकच्या गाड्यांना काय म्हणतात? आणि कुत्र्यांच्या?‌--अद्वैतुल्लाखान