मुद्दा हा आहे की आयपील हे क्रिकेटचे भ्रष्ट स्वरुप आहे....

शहरांचा आणि टीमचा काहीही संबंध नाही.....उगी शहरांची नावे दिली आहेत.

प्रत्येक गोष्ट पैशाने, लोचट प्रसिद्धीने ओरबाडून, भ्रष्ट करून टाकायची ही आजकालची रीतच आहे....

विचार करा..... वर्षानुवर्षे उत्तम, दर्जेदार क्रिकेटची सेवा करणारा, कुठल्याही फळांची अपेक्षा न करत , कर्तव्यनिष्ठूरपणे अन्याय सहन करून खेळणारा क्रिकेटपटू अमोल मुझुमदारला (व त्याच्यासारख्या इतर सर्व खेळाडूंना) काय वाटत असेल ?

या तद्दन पैसेकमावू, धंदेवाईक व भ्रष्ट आवृत्तीला अमोल सारखे व्रतस्थ खेळाडू कसे सामोरे जात असतील ?

कला, क्रीडा, राजकारण, नीतिमत्ता या सर्वच ठिकाणी अशी नैतिक घरसण वेगाने होत आहे !

 
आयपील हे जर धंदेवाईक न करता, क्रिकेटचा मान राखून, पैशाची बजबजपुरी न करता, खेळाडूंना माजू न देता एक चांगले व्यासपीठ झाले तर ठीक ! नाहीतर भारतीय क्रिकेटचा कठीण काळ आहे.... (कारण पवार, मोदी या उन्मत्त लोकांचा व 'विवेक' या गोष्टीचा कधीही संबंध नाही.... त्यामुळे त्यांना हे मुद्दे सुचंण कठीण !)