पाठ्यपुस्तकांमध्ये दुहिता ह्या शब्दाचा अर्थ गायीचे दूध काढणारी (दोहन
करणारी? ) असा काहीसा वाचल्याचे आठवते. कदाचित पूर्वीच्या काळी गायींचे दूध
काढण्याचे काम घरातल्या मुलींकडे असावे
'दुहिते'च्या व्युत्पत्तीबद्दलचे असेच काहीसे मत मीही (श्रवणभक्तीने) ऐकलेले आहे.
अवांतर (श्रवणभक्तीची फलिते, अर्थात बाबावाक्यानि प्रमाणानि (? संस्कृत व्याकरणाची चूभूद्याघ्या!) - गरजूंनी स्वकष्टाने पडताळून पाहावीत व स्वतःच्या जबाबदारीवर स्वीकारावीत.):
- संस्कृत दुहितृ (? ), फारशी दुख़्तर आणि इंग्रजी डॉटर हे एकाच जातकुळीतले शब्द.
- किंबहुना 'डॉटर'च्या स्पेलिंगमधला 'जी-एच्' हा अनुच्चारित अवशेष (काहीसा मानवी शरीरातील निरुपयोगी परंतु अवशिष्ट अपेंडिक्सप्रमाणे) 'दुख़्तर' आणि 'दुहितृ'बरोबरचे 'डॉटर'चे पुरातन नाते अधोरेखित करतो.
अतिअवांतर:
- अमेरिकेतील किमान एका तरी फारशी भोजनालयात (येथे मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचा मुंबईपुण्याकडील इराण्याच्या हाटेलांतील खाद्यपदार्थांशी फारसा किंवा जवळपास काहीही संबंध जाणवला नाही. ) 'दूग़' नामक एक मसाला ताकवजा दुभत्याचा पेयपदार्थ चाखलेला आहे. दूग़-दुख़्तर-दुहितृ साधर्म्यावरून दूग़चा दुख़्तरशी आणि त्याअन्वये (दुख़्तर-दुहितृ नात्याच्या पार्श्वभूमीवर) दुग्धाचा दुहितेशी संबंध अधिकच अधोरेखित व्हावा काय? (दूग़-दुख़्तर संबंधाबाबतचा तर्क सर्वस्वी माझा - चूभूद्याघ्या. )