थरथरत असतात
जुन्या कवितांतली अक्षरे,
कागदाची शंभर टक्के
खारपड जमीन पोटातून
धडधडू लागते,

किंवा

जुने शब्द उन्मळून पडतात,
जमिनीच्या थरांची थारेपालट होते,

वगैरेवगैरेंवरून, बहुधा 'नव्या कविता बनवताना कवी जुन्या कवितांतील अक्षरे रीसायकल (मराठी? ) करतो' अशासारखे काही सुचवायचे असावे, असे वाटते. शिवाय, 'कागदांची शंभर टक्के खरपड जमीन पोटातून धडधडू लागते' वरून, अक्षरांबरोबर कागदाचेही रीसायकलिंग होत आहे असे दिसते - तेही थोडेथोडके नव्हे, तर पूर्ण शंभर टक्के! '१००% पोस्ट-कंझ्यूमर रीसायकल्ड पेपर' - भले शाबास! (कवी पर्यावरणवादी असावा असे वाटते - असल्यास उत्तमच आहे.)

कवीची भेलकांडलेली
पावले पडतात
तेव्हा कविता
कल्लोळून उठते,

शाळेच्या दिवसांत, आमचे हस्ताक्षर गलिच्छ आहे हा मुद्दा आमच्या मनावर बिंबवण्यासाठी आमची मास्तरमंडळी (विशेषतः मास्तरणी! ) त्यास शाईत बुचकळून कागदावर सोडून दिलेल्या झुरळाच्या पावलांच्या उठलेल्या ठशांची उपमा देत असत. कवीचे तसे काही आहे असे यातून सुचवायचे असावे की काय, कवी अर्वाच्य (म्हणजे 'सुवाच्य'च्या विरुद्धार्थी) लिहीत असावा किंवा कसे, अशी शंका येते.

आणि कवीची पावले भेलकांडलेली का बरे पडत असावीत? हेही गूढ काही केल्या उकलत नाही.

एकंदरीत कविता विशेष समजली नाही. शेवटच्या चार-एक ओळी मात्र विशेष समजल्या. (मात्र, एवढी उलथापालथ केल्यावर केवळ एक बिंदू म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखे वाटले. बहुधा हृदयाजवळील खिशात ठेवताना टोपण लावायचे विसरून गेल्याने बरीचशी शाई शर्टावर खपली असावी.) पुलेशु.