एखाद्या देशातील किती टक्के लोक एखाद्या व्यवसायावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या अवलंबून आहेत यावर त्य देशाचा प्रधान व्यवसाय काय हे ठरवले जाते. भारतात कृषीवर सर्वात अधिक (वाजवीपेक्षा खूपच अधिक) लोक शेतीवर वलंबून आहेत, म्हणून भारताला कृषीप्रधान म्हटले जाते.
शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी देशाचा पोशिंदा आहे वगैरे म्हणण्यामागचा हेतू तोच.
या देशाला कृषीप्रधान मानावे अशा कुठल्याही पाऊलखुणा प्रतीबिंबीत होतांना
दिसत नाहीत, या देशातल्या राजकिय नेत्यांच्या डोक्यात शेतकरी प्रथमस्थानी
कधिच नव्हता,आजही नाही. बुद्धीप्रामाण्यवादी,थोर-महान विचारवंताच्या
वैचारिक बैठकीचा केंद्रबिंदु "शेती आणि शेतकरी" कधिच नव्हता, आजही नाही. मग
हा देश कृषीप्रधान कसा?
अशी सरसकट विधाने करणे चुकीचे आहे. विचारवंतांच्या बैठकीचा केंद्रबिंदू शेती नव्हता म्हणजे काय? सर्वसामान्य माणसाला शेती या विषयाबद्दल किती माहीती असते? आणि ती माहीती करून घेण्याची उत्सुकता तरी किती असते? भारतात पाऊस नेमका कशामुळे पडतो आणि खरीप आणि रब्बी पिकांची उदाहरणे काय हे चटकन किती लोकांना सांगता येईल?
एकंदरीत कुतुहलाचा अभाव आणि सामाजिक मठ्ठपणा हा सगळ्याच क्षेत्रांत आहे. कृषी हे क्षेत्र त्याला अपवाद नाही असे फारफारतर म्हणता येईल.
लेखातील इतर विधानेही अशीच जनरलायझेशन्स आहेत. नेमका विदा (डेटा) उपलब्द्ध नसेल तर अशी सरसकट धाडसी विधाने (स्वीपींग स्टेटमेंटस ) करू नयेत.