काही उचापत्या... येथे हे वाचायला मिळाले:
कॉलेजमधुन घरी आलो होतो. घरात पाऊल ठेवतो न ठेवतोच तर बाबा फोनवर कुणाबरोबर तरी मोठ्याने बोलत होते ते कानावर पडले. "देवानं तुम्हाला अकला दिल्या नाहीत कारे. सोन्यासारख्या पोरीचा जीव घेतला तुम्ही. काय कमी केलं रे तुमच्यासाठी तिने. शेतात गुरासारखी कामं केली ना तीने... घरात मोलकरणीसारखी राबवून घेतलीच ना.. त्यात तुम्हाला तीची काळजी घेता नाही आली...." आई पलंगाला डोक्याला हात लावून बसलेली. मला काय झालं ते कळेना. आईला हात लावुन विचारलं काय झालं. ’सुमन... सुमन गेली’. आई एवढचं बोलुन डोळे पुसत किचन मध्ये गेली. ते ऎकुन मी पुर्ण बिथरलोच.