'दूग' नामक एक मसाला ताकवजा दुभत्याचा पेयपदार्थ चाखलेला आहे. दूग-दुख्तर-दुहितृ साधर्म्यावरून दूगचा दुख्तरशी आणि त्याअन्वये (दुख्तर-दुहितृ नात्याच्या पार्श्वभूमीवर) दुग्धाचा दुहितेशी संबंध अधिकच अधोरेखित व्हावा काय? (दूग-दुख्तर संबंधाबाबतचा तर्क सर्वस्वी माझा - चूभूद्याघ्या. )
"दूग" हा शब्द "दूध" शब्दाशी जवळचा वाटतो. "दूध" हे "दुग्ध"वरून आले हे उघड आहे. संस्कृतमध्ये मोहित म्हणजे मुग्ध तसेच दोहित/दुहित (दोहन क्रियेचे फलित) म्हणजे दुग्ध असावे की काय?
विनायक