आदरणीय हरणटोळ महोदय/महोदया,
खालील प्रश्नांची विज्ञानाभिमुख पद्धतीने उत्तरे द्यावीत हि नम्र विनंती.
१. मन खंबीर नसेल तर माणसाने अश्या प्रसंगी काय करावे?
२. विज्ञानाभिमुख होण्याने मन खंबीर होते काय?
३. कर्मकांड करणाऱ्या सर्व लोकांची मने खंबीर नसतात काय?
४. विज्ञानाभिमुख असणाऱ्या सर्व लोकांची मने खंबीर असतात काय?
५. "हिंदूंनी मयतानंतर दिवस घालू नये" हे ज्या हिरीरीने मांडता तितक्याच हिरीरीने "मुसलमानांनी-ख्रिश्चनांनी मृतदेह पुरू नये, जाळून टाकावेत" असे आपण सांगता का?
६. विज्ञानाभिमुख होणे म्हणजे सर्व मानवी भावनांना भडाग्नी ("मंत्राग्नी" शब्द टाळला आहे) देणे असा अर्थ आहे काय?
७. धर्म आणि विज्ञान मानवी जीवनांत गुण्यागोविंदाने नांदू शकत नाहीत काय?
८. ज्या ठिकाणी श्रद्धेचा प्रश्न येतो तेथे प्रत्येकाला आपापला मार्ग चोखंदळण्याची मुभा आहे असे आपणांस वाटते का?
९. इतर लोकांची मानसिक अथवा शारीरिक हिंसा न करता जो-तो आपली श्रद्धा-अश्रद्धा बाळगण्यास स्वतंत्र आहे असे आपणांस वाटते का?
१०. जसे आस्तिकांनी आपल्यावर आस्तिकपणाची सक्ती करू नये असे नास्तिकांना वाटते. तसेच नास्तिकांनी आपल्यावर नास्तिकपणाची सक्ती करू नये यात आस्तिकांचे काय चुकले बरे?
११. असेच शाकाहारी विरुद्ध मांसाहारी वादाबद्दलही म्हणता येईल असे वाटते का?
१२. मग असेच विज्ञानाभिमुख विरुद्ध कर्मकांड करणारे याबद्दलही म्हणता येईल असे वाटते का?
आपले विचार वाचण्यास उत्सुक आहे.
कळावे, लोभ असावा.