हल्ली मुले आई - वडिलांना घराबाहेर कढतात ..
पण इथे आईने घराबाहेर काढले आहे .. तेही योग्य कारणास्तवच.. हे जरा वेगळं आहे ..आणि कारण पाहता योग्यच आहे
घराबाहेर काढणारी आई नसून ति एक खोटारडे, गलिच्छ आरोप सहन न झालेली स्वाभिमानी स्त्री आहे .. ति तिच्या जागेवर अतिशय योग्य आहे.
आपल्या मुलांना परत घरात घेणारी मात्र एक आईच आहे ..एक हतबल झालेली आई .. ..
जरी गौरीला तिची चूक कळलि असली तरी आता फार उशीर झाला आहे ..
त्यामुळे सविताने मन घट्ट करून त्या दोघांना घरात न घेणं हेच योग्य ठरेल .. आपल्या आईवर असले घाणेरडे आरोप करायला थोडी तरी लाज वाटली का त्यांना? त्यांना एकच शिक्षा, घराचे दरवाजे कायमचे बंद ..
आणि समाजातील लोकांचा इथे प्रश्न येतच नाही .. कारण हे उलट सुलट बोलणारे लोक त्या दोघांना सांभाळणार नाहीयेत ..
त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे हेच बरोबर ..
लेख जबरदस्त आहे .. भावला मनाला..