काय दुर्लक्ष हे पाहिल्या पाहिल्या...
का अशी घेत आहेस माझी दखल?

मानवी आज योनी... उद्या वेगळी
ही रहस्ये उकल ती रहस्ये उकल

विश्व ओलावल्यासारखे वाटते
पापण्यांच्यामधे एक पडदा तरल

 हे शेर आवडले.

काय जाणे कुणी आखली ही सहल

 'काय जाणे' हे हिंदी 'क्या जाने' चे भाषांतर आहे का? तसे असल्यास ते मराठीत बरोबर वाटत नाही. जर 'काय जाणे' वरील  ओळीच्या व 'सहली'च्या संदर्भानुसार प्रवाससूचक (भौतिक, आध्यात्मिक, कोणताही) असेल तर त्यानंतर अर्धविराम (; ) दिल्यास अर्थ स्पष्ट होईल.