दुजेविण संवादु येथे हे वाचायला मिळाले:
मोठ्या साहेबाचा खाजगी सचिव ही एक वेगळीच जात असते. मग तो पुरुष असो किंवा स्त्री असेल, त्या पदावर काम करणे एक अवघड कसरतच असते. माझ्या अनुभवात अशा ७-८ व्यक्ती तरी बघण्यात आल्या. त्यातल्या काही अगदी साहेबासारख्या कडक तर काही अगदी लोकाभिमुख. पण एक गोष्ट समान कि त्या सर्व अगदी perfectionist होत्या. अनेक साहेब येतात आणि जातात. त्या सर्वांच्या लहरी सांभाळायच्या, गुपिते जपायची आणि इतरांकडून छोटीमोठी कामे करून घ्यायची ही गोष्ट जमायला पाहिजे. मग कधी अशी वेळ येते कि नवा साहेब वयाने लहान असतो आणि सचिव वयाने व अनुभवाने मोठा. त्यातून दाक्षिणात्य स्टेनो ...