सांगत्ये ऐका... येथे हे वाचायला मिळाले:

सकाळी जमेल तितक्या लगबगीने आवरुन विंदुने दाराला कुलुप घातले आणि गाडीचे कुलुप काढणार तर सिधुची गाडी तिच्या गाडीच्या मागे उभी बघुन तिच्या तोंडुन पटकन "अरे देवा" निघुन गेले. आधीच उशीर झालेला त्यात आता पुन्हा गाड्या पुढे-मागे कुठे करा म्हणुन तिने निमुट पिशवीतुन दुसरी चावी काढली नी सावकाश पायर्‍या उतरु लागली. नाही म्हंटले तरी सहावा लागुनही एक आठवडा उलटुन गेला होता. पोट आता चांगलेच दिसु लागले होते. त्यामुळे एरवी कितीही कौतुकाची असली तरी आता सिधच्या स्पोर्टस् कारमधे बसायचे म्हणजे विंदुला अवघडल्यासारखे व्हायचे. "संध्याकाळी सांगितले पाहिजे सिधला ...
पुढे वाचा. : क्षणभर