सांगत्ये ऐका... येथे हे वाचायला मिळाले:
मी आणि आपला मुंगेरीलाल भारत सरकार तर्फे एका कामगिरीवर अमेरिकेत गेलो होतो. अमेरिकेत म्हणे एक मोठी इमारत आहे ज्यात असंख्य अतिरेक्यांच्या मदतीने बाँबनिर्मीती चालु होती. मी आणि मुंगेरीलाल अमेरिकेला ह्या पासून रोखण्यासाठी आणि भारत-पाकिस्तान (हे काय मधेच ? पण असे होते खरे) संबंध सुरळीत करण्यासाठी गेलो होतो. मी मुंगेरीलालची सेक्रेटरी होते. मी भयंकर तडफदार आणि स्मार्ट होते (होते काय्य्य्य्य...आहेच !!!). आमच्या जिवाला धोका आहे अशी सगळीकडे कुणकुण होती. पण मुंगेरीलाल हट्टाने तिथे गेला होता.