नायिकेने मुलांना घराबाहेर काढले हे योग्यच झाले. पण इतकी वर्षे श्रीमंत जीवनशैलीला चटावलेली मुले बापाकडे तुलनेने गरिबीत राहिली आणि त्यांनी आईची क्षमा मागून तिच्याकडे परत यायचा प्रयत्न केला नाही हे नैसर्गिक वाटत नाही. एकदा वि. वा. शिरवाडकरांना "नटसम्राट" मधला म्हातारा हा नटच असायला हवा होता का की साधा पेन्शनरही चालला असता असे विचारले होते. त्याच धर्तीवर या कथेतली नायिका घटस्फोटित, कर्तृत्ववान आणि श्रीमंत नसती तरीही तिला (आणि तिच्या नवऱ्याला) मुलांकडून असे अनुभव आलेच असते असे वाटते.
तरूण मुलांना त्यांची स्पेस हवी असते, मोठ्यांनी एका मर्यादेपलिकडे त्यांच्या गोष्टींमध्ये लक्ष घातलेले आवडत नाही हे लक्षात घेऊन त्यांच्यामधली इन्वॉलमेंट कमी करून किंवा पूर्णपणे काढून घेऊन तिला मुलांबरोबर राहता आले असते. अर्थात मुलांची शिक्षणे, करियर, संस्कार, वर्तणूक वगैरे गोष्टी चुकीच्या मार्गावर जात असताना दुर्लक्ष करणे तिला कितपत शक्य झाले असते आणि तसे तिने करणे नैतिक ठरले असते का हेही प्रश्न आहेतच.
अंतर्मुख करायला लावणारी कथा आहे हे नक्की.
विनायक