टॅब्‍लॉइड नावाने ओळखली जा‍णारी छोट्या आकारमानाची लघुवर्तमानपत्रे ही प्रामुख्याने गुन्हेगारी, ज़ु‍गार, लॉटरी, अफ़वा, कुचाळक्या, गांवगप्पा या विषयांना किंवा सनसनाटी बातम्या आणि स्थानिक समाचाराला वाहिलेली असतात.  एकदा वाचून फेकून देण्यापलीकडे त्यांना महत्त्व नसते. अशी वृत्तपत्रे एकतर विनामूल्य असतात किंवा त्यांची किंमत नगण्य असते. त्यांच्या संपादकीयांत  मतप्रदर्शन नसते पण असलेच तर ते कुणी गांभीर्याने घेत नाही. मराठी वर्तमानपत्रांचा उद्देश असाच असेल तर ती ज़रूर त्या आकारात प्रसिद्ध व्हावीत.
बाकी, रोज चारपाच तास प्रवास करणाऱ्यांना एक टॅब्‍लॉइड काय पुरणार? त्यापेक्षा त्यांनी प्रवासादरम्यान एखादा धार्मिक ग्रंथ वाचावा. त्याची लांबीरुंदी कमी असते आणि न संपल्याने तो फेकून द्यावा लागत नाही. योगवासिष्ठ मी असाच वापरतो. वाचताना झोप छान येते आणि प्रवासातील वेळ सत्कारणी लागतो.--अद्वैतुल्लाखान