वर्तमानपत्रातील बातम्यांच्या छपाईसाठी काम करणारी माणसे आणि मथळा देणारी वेगवेगळी असतात. याचा परिणाम असा होतो की मथळ्यात वापरलेला शब्द बातमीतल्या शब्दापेक्षा वेगळा असतो.
असा प्रकार पुस्तकछपाईत होतो. एकही शुद्धलेखनाची चूक नसलेल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चित्रकाराने
रंगवलेल्या मथळ्यात अक्षम्य चूक असते. रस्त्यावरती रंगवलेल्या एका ओळीच्या पाटीवर एकतरी चूक
आढळतेच, कारण ते काम टेंडरे मागवून स्वस्तात करवून घेतलेले असते.  आणि काय लिहायचे त्याच्या सूचना
कनिष्ठ अधिकाऱ्याने तोंडी दिलेल्या असतात.--अद्वैतुल्लाखान