kedusworld येथे हे वाचायला मिळाले:
आज दोन वर्ष झाली पण मी जेव्हा जेव्हा शीलाला पहतो तेव्हा तेव्हा मनाच्या कुठल्यातरी कोपर्यात एक वेगळिच अस्वस्थता जाणवते. शीला म्हणजे माझी एक चांगली मैत्रीण आणि माझा खास मित्र अजीत ह्याची बायको. आम्हि तिघे एकाच ऑफिसमध्ये काम करतो. अजीत आणि मी लहानपणापासूनचे जीवलग मित्र. आम्हि दोघ एकाच शाळेत गेलो, एकाच कॉलेजमध्ये शिकलो, आणि योगायोगच म्हणा पण नोकरी देखील एकाच ठिकाणी करतो आहोत. शीलानं साधारण तीन वर्षापूर्वी आमच ऑफिस जॉईन केलं. शीला दिसायला तशी बर्यापैकिच पण तिची राहणी, वागण, आणि बोलण एक्दम डिसेंट असत. तिचा मनमोकळा स्वभाव पटकन समोरच्याला आपलस ...