''अरे मला वाटलं तुम्हाला आवडत असेल " -- वाटून घेण्यापेक्षाही वागण्या-बोलण्यातून-नजरेतून जाणून घेणे महत्त्वाचे असते असे मला वाटते...कारण शेवटी प्रत्येक गोष्टीला २ बाजू असतात'च आपल्याला आवडेल ती पाहत राहणे हा अट्टाहास का ?
केळकर काकू सांगत होत्या मला सगळं. तू आणि तुझे पिसाट मित्र.... + हलकट पोरं + तुमच्यासारख्या नतद्रष्ट कार्ट्यांना भिकार मुलामुलिंबरोबर नाच केले, नाक्यावर उभं राहून बिड्या ओढल्या, चार वाक्य इंग्रजीत बोलून दाखवली की --- हे सगळं काय एकदम त्या रात्रीत झालं का ? आधिपासुनच होत हे.. आणी हे माहित असुनही त्या त्या वेळी समज न देणे हे योग्य आहे का ? केवळ मित्राचे नाव जोडले/घेतले तर एवढे हाय पिच वर ऍग्रेसीव होण्यासारखं काही होतं हेच शिविगाळ न करता आणि समाजमान्य शब्द वापरून आधीच सांगता आले असते ना... म्हणुनच कदाचीत ''मॉम तुला काय हवंय नक्की आमच्याकडून. तू फक्त तुझा आणि तुझ्या लाईफस्टाईलचाच विचार करत आली आहेस. काय गरज आहे तुला आता इतकं हॉट वगैरे दिसण्याची. तुझं वय झालंय मॉम आता. सो प्लीझ हे असं फंकी वागणं सोड तू. जरा मॅच्युअर्ड आईसारखी वाग एकदा तरी? हे आधीचे वाक्य नॉर्मल वाटले... !
सवितानं कामात स्वतःला पूर्णपणे गुरफटून घेतलं तरीसुद्धा मुलांचा विचार तिच्या मनातून काही केल्या जाईना -- ह्यात तथ्य वाटत नाही कारण खरेच जर विचार मनातून जात नसेल तर तिने रोज त्यांन्ना शोधायला पाहिजे होत.. कारण ते त्याच फ्लॅट मध्ये राहत होते बरेच दिवस...नुसता विचार करण्यात अर्थ नाही.
मागचा सगळा अपमान विसरून सविता गौरी आणि अमितला पुन्हा घरी घेऊन आली -- खटकले... जरा खटकले...आईचे काळीज वगैरे ठिक आहे पण कुंपणच शेत खायला लागल्यावर तरी निदान कुंपणावर तारा वाढवू नयेत !
मोठं झालं आणि काहीही झालं तरी आईला आणि बाईला क्षमा नाही ---
हे मान्य १००% कारण "स्त्री" शिवाय कोणातही क्षमा करण्याएवढे सामर्थ नाही... पुरुष ताकदवान असतात, त्यांन्ना सामर्थ्यशाली स्त्री बनवते... स्त्रीरुप पुरुषाला राजा बनवू शकते आणि भिकारी देखील... त्यामुळे हे पटले कारण असे नव्हे की तिला क्षमा नाही... परंतु तिला क्षमा करण्याची कुवत बाकिच्यांत नाही म्हणुनच... (कृपया विपर्यास नको)
------------------------ बाकी लेख चांगला आहे, ३rd party listener/reader च्या दृष्टीने... ( माफ करा पण हे ईंग्रजी शब्द मराठीत लिहिले तर त्या वाक्याचा पाहिजे तसा Impact अर्थातच प्रभाव पडत नाही...म्हणुन)