या परिवर्तनामुळें क्रिकेट आकर्षक झालें आहे हें मान्य करावेंच लागेल. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीं आतां चारशें धांवा होतात. पूर्वीं एखादाच सोलकर एखादा जाँटी ऱ्होडस असे. आतां मात्र जवळजवळ प्रत्येकाचेंच क्षेत्ररक्षण ही प्रेक्षणीय गोष्ट आय पी एल नेंच झाली आहे. राहुल द्रविडच्या खेळाचा तर आयपी एलनें कायापालटच केला आहे. त्यामुळें पुणेकरांचे अभिनंदन.
सकारात्मक बदलही ध्यानांत घ्यावा. आवडलें नाहीं तर आपल्या चित्रवाणी संचाचा दूरस्थ नियंत्रक आपल्याच हातांत असतो कीं. माझा आवडता संघ हरायला लागला कीं मींही त्याचा वापर करतों.
फक्त तंबाखू सिगरेट दारू उत्पादनें करणाऱ्या कंपन्यांचा पैसा टाळायला पाहिजे.
सुधीर कांदळकर