अकबर होता, जुलूम होता, अन सुलतानी सत्ता
खुशालचेंडू मजेत होते, घामाची हालत खस्ता
काय निराळे आज भासते, तितुकेची सांगावे
तुमच्यामध्ये काय 'वेगळे' याचे उत्तर द्यावे…!!

रेल्वे आली, विमान आले, आले शाळा-रस्ते
कोर्ट-कचेर्‍या अन नोकर्‍या, त्याही गोर्‍या हस्ते
काय निराळे तुम्ही घडवले, तितुकेची हाकावे
तुमच्यामध्ये काय 'वेगळे' याचे उत्तर द्यावे…!!     


 ह्या ओळी विशेष आवडल्या .!   तडका अजून हवा होता ( मला तिखट आवडत म्हणुन)       बाकी झकासच!