शेती हाच बहुसंख्य लोकांचा एकमेव उद्योग असेल तर तो देश शेतीप्रधान ठरत नाही का? आज केवळ शेतकर्‍यांना परवडावे म्हणून कित्येक बाबींवर हजारो कोटी रुपयांची सब्सिडी आहे. डीजेल चा उत्पादन खर्च  पेट्रोल एव्हढाच, किंबहुना अधिकच असूनही ते केवळ शेतकर्‍यांचे हातपंप आणि ट्रॅक्टरादी साधनांचा वापर कमी खर्चिक व्हावा म्हणून कृत्रिमरीत्या स्वस्त केलेले आहे. 

शासकांकडून होणारा प्रचार हा निखालस खोटा असून चक्क बनवाबनवी आहे.
शेतकऱ्यांची मुले आता शिकली - सवरलीत त्यामुळे शासकांच्या बनवाबनवींचे 
खेळ यापुढे उघडे पडतील.हे अवश्य वाचा.  

शेतीला सबसिडी कशाला हवी? (http://gangadharmute.blogspot.com/2010/03/blog-post_23.html)

गरीब व विकसनशील देशांत शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असतो, त्याच्या भोवतीच अर्थव्यवस्था फिरत असते, हीच परिस्थिती भारतात अजूनही आहे.

आता ती परिस्थीती राहीलेली नाही.
१९७० साली भारताच्या समग्र उत्पन्नाच्या ४६% टक्के उत्पन्न शेतीतून येत होते आणि ७०% जनता शेतीवर रोजगारासाठी अवलंबून होती. त्या अर्थाने भारत हा कृषीप्रधान देश होता आणि शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा होती.मात्र आज चित्र वेगळे आहे. आता भारताच्या समग्र उत्पन्नाच्या फक्त १६% टक्के उत्पन्न शेतीतून येते पण अजूनही ५५% जनता शेतीवर रोजगारासाठी अवलंबून आहे. (जीएस)