नुकतेच "संग्रहणीय लेख" असा अभिप्राय दिलेला वाचला. मराठीत संग्रहणीय असा शब्द नाही. संग्रहणी याचा अर्थ हगवण किंवा अतिसार. बहुधा संग्राह्य म्हणायचे असावे. श्री. कृ. कोल्हटकरांच्या पुस्तकात वाचलेला विनोद आठवतो. पांडुतात्यांनी चांगली चांगली वचने, सुविचार वगैरे एका वहीत सुवाच्य अक्षरात लिहून त्याला नाव दिले "सारसंग्रह" तर काही चावट कार्ट्यांनी त्याच्यामागे "अति" आणि पुढे "णी" लावले.
दुसऱ्या एका लेखात "अनुवादनाच्या क्रियेत" असा शब्द "अनुवादाच्या प्रक्रियेत" अशा अर्थाने वापरला होता. वीणावादन. सतारवादन, यासारखे "अनु" नावाचे वाद्य वाजवण्याची क्रिया असा गैरसजम त्याने होऊ शकतो म्हणून असे प्रयोग टाळावेत.
विनायक
(संपादित : प्रशासक)