वीणावादन. सतारवादन, यासारखे "अनु" नावाचे वाद्य वाजवण्याची क्रिया असा
गैरसजम त्याने होऊ शकतो
यावरून (नुकत्याच इतरत्र वाचलेल्या / पाहिलेल्या) "गिटारच्या धड्या"ची आठवण झाली. (गरजूंनी स्वतः शोध घ्यावा. समजणाऱ्यास इशारा मुबलक.) "वीणावादन" या शब्दाकडे बघण्याकरिता एक नवा दृष्टिकोनही मिळाला. आभारी आहे.
अवांतर: "गिटारच्या धड्या"करिता (त्याबद्दलच्या एखाद्या लेखनाच्या अनुक्रमणिका, मुखपृष्ठ अशा ठिकाणी ठळकपणे होणाऱ्या उल्लेखाचा प्रश्न पुढेमागे आलाच तर मराठीत असावा या दृष्टिकोनातून) "वीणावादन" हे मराठीकरण (मराठमोळीकरण?) सुटसुटीत वाटते.