मुद्रितशोधनाचा व्यवसाय काम करणाऱ्या डझनभर व्यक्तींचे पत्ते आणि
दूरध्वनिक्रमांक 'प्रकाशनविश्व'मध्ये दिलेले आहेत. मात्र त्यांतले किती जण विपत्राने काम करू शकतील याबद्दल चौकशी करावी लागेल.
तसे पाहिले तर शुद्ध लिहिणे तितकेसे अवघड नाही. आपल्या लेखनात शुद्धलेखनाच्या
चुका राहू नयेत यासाठी
(१) लिहिलेल्या किंवा टंकित केलेल्या ऱ्हस्व इकार-उकारांचा ऱ्हस्व, आणि
दीर्घांचा दीर्घ उच्चार करीत वाचून
काढणे. एखादी चूक झाली असल्यास समजून येतेच येते.
(२) मनोगत किंवा अन्य संकेतस्थळावरील शुद्धलेखनचिकित्सेचा लाभ घेणे.
(३)
मनोगतावर असलेल्या किंवा बाज़ारात मिळणाऱ्या अनेक कोशांपैकी एखादा शुद्ध
शब्दांचा कोश लिखाण करताना ज़वळ बाळगणे.
(४) अनुस्वारित शब्द लिहिण्याचा हव्यास न करणे. असे शब्द लिहिताना हमखास
चुका होतात.
या पानाच्या आरंभी आलेल्या मजकुरातील टाळता येण्यासारख्या काही त्रुटी अशा :
मदत, प्रकाशकाकडे, घेऊन, देण्याचे, करते, असे, माहीत, सांगाल, मेलने, हवे, वगैरे.
मुळात हे वाक्य असे हवे होते. :
प्रकाशकाकडे पाठवावयाच्या माझ्या लिखाणाचे शुद्धलेखन कुणी मोबदला घेऊन तपासून देईल का? ई-मेलने असे काम कुणी करत असल्याचे माहीत असेल तर सांगावे.
--अद्वैतुल्लाखान