आनंदवनातील शेतकऱ्यांची सर्वसाधारण शेतकऱ्यांशी तुलना करू नये असे वाटते. 
आनंदवनातील लोकांच्या आयुष्यात अनेकानेक दुःखे, अपमान आली असून ते धीराने वाटचाल करतात हे कौतुकास्पद आहेच. 
पण अगदीच काही नाही तर एक संस्था त्यांच्या पाठीशी आहे. त्यांचा समाज म्हणजे त्यांच्या आजूबाजूचे लोक - हे एकमेकांना मदत करतात. आपण एकटे नाही, आपल्यासारखे बरेच लोक आहेत ही भावना खूप महत्त्वाची आहे. कुष्ठरोगाने ग्रासल्यामुळे इतर ( बिनरोगी ) समाजाकडून मिळालेली वाईट वागणूक या समदुःखामुळे झालाच तर फायदाच होईल. संघभावना वाढेल.
दुसरे म्हणजे मूलभूत गरजा भागवता येतील इतपत आता आनंदवन स्वयंपूर्ण असावे.

आणखी महत्त्वाचे म्हणजे - देणग्या.
पैशाचे सोंग आणता येत नाही.
विदर्भात दुष्काळ आहे, आनंदवनाला मदत करा, अश्या आशयाचे आवाहन काही महिन्यांपूर्वी जालावर वाचले होते. 

साध्या शेतकऱ्यासमोरचे प्रश्न आनंदवनातल्या कष्टकऱ्यांपुढे उभे राहत नाहीत. या दोन गटांचे मुख्य प्रश्न वेगळे आहेत.
विकास आमटेंना हे लक्षात येत नसेल तर आश्चर्य आहे.

शिकता येण्यासारखा धडा म्हणजे शेतकरी संघटित झाला तर काही करणे शक्य आहे. गावपातळीवर एकत्र येण्याचे प्रयत्न अनेक गावात होताहेत. त्यातून काही चांगले घडेल असे वाटते.