संस्कृतमध्ये ग्रहणी, ग्रहणि:, ग्रहणिरुक्, ग्रहणिरुज्, संग्रहणी आणि प्रवाहिका असे शब्द अतिसार या अर्थाने आहेत. (रुक्=रुज्=रोग/विकार). ग्रहणी रुक्प्रवाहिका  --अमरकोष(२.६.५५)
संस्कृतमध्ये असल्याने हिंदीतही ग्रहणी, संग्रहणी, अतिसार, प्रवाहिका आणि मलवेग इत्यादी शब्द आहेत.  आणखीही असतील.
मराठीत अतिसार, (सं)ग्रहणी, हगवण,  प्रवाहिका यांव्यतिरिक्त हगरण, भसरें, धंडाळी, धांडाळी,  धेंडाळी, धेंडोळी, ढेंढळ, ढेंढाळी, ढाळ लागणे, ढगळ, डरंगळ, फ़ोकांडी, बहिर्भूमीची व्यथा, ढगळपट्टी, ढेंढळपट्टी, मुसळवादा असे बरेच शब्द आहेत.
असले अर्थ असल्याने संग्राह्य या शब्दाऐवजी संग्रहणीय वापरणे मराठीनेच नव्हे तर हिंदीनेही टाळणे योग्य.--अद्वैतुल्लाखान