माझ्या समजुतीप्रमाणे सर्वच तंतुवाद्यांना वीणा म्हणता येते. वीणा म्हणजे तंतुवाद्य असे (बहुधा पं. शिवकुमार शर्मांच्या बोलण्यातून) ऐकल्यासारखे वाटते. संतुर = शततंत्री वीणा. तंबोरा = तुंबरी वीणा (तुंबर वाजवत असे म्हणून) असा काहीसा अर्थ त्यांनी सांगितल्याचे आठवते.

बा. भ. बोरकरांनी 'गितार' असा शब्दप्रयोग केलेला आहे तो गिटार ह्या अर्थीच आहे असे वाटते. तसे असल्यास तोही चांगला वाटतो. चू. भू. द्या. घ्या.