अनवधानाने 'त्या पूर्व सातांचा काय दोष होता?' असे टंकित झाले आहे. तेथे 'त्या पूर्व सहांचा काय दोष होता? ' असे कृपया वाचावे. तसेच, या चरणापुढील एक ओळ टंकित करावयाची राहिली आहे... 'उन्मत्त जीवनरक्षेच्या हट्टापायी' ही ती ओळ आहे.
पहिले कडवे कृपया असे वाचावे :-
कंसाची अंतिम गंतव्यता निगडित होती
देवकीच्या आठव्या अपत्याशी
त्या पूर्व सहांचा काय दोष होता?
उन्मत्त जीवनरक्षेच्या हट्टापायी
हकनाक चिणून मरण्यासाठीच
क्षणभंगुर रूदन त्यांचं!
झाल्या चुकीबद्दल क्षमस्व!
मनापासून दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.