उन्हाळ्याची सुट्टी येथे हे वाचायला मिळाले:

एकदा शाळेत मराठीच्या तासाला आम्हांला "आई म्हणोनी कोणी" ही कविता शिकवायला घेतली होती बाईंनी. माझं खरं तर कवितेवर भारी प्रेम. लहानपणापासूनच मी कविता करायचे आणि वाचायचे. त्यात अज्जीचा खूप मोठा हात होता हे सांगायला नकोच! त्यामुळे रसग्रहण मला फार फार आवडायचं. आमच्या मराठीच्या इनामदार बाईसुद्धा खूप मनापासून शिकवायच्या. त्या तासाची मी खूप आतुरतेनी वाट बघायचे नेहमी. पण त्या दिवशी त्यांनी ती कविता शिकवायला घेतली आणि झालं! सगळ्या मुली पाच मिनिटांत मुसमुसून रडू लागल्या. पहिलं कडवं होईपर्यंत रंगानी "जरा उजव्या" असलेल्या सगळ्या मुलींची नाकं लाल झाली ...
पुढे वाचा. : आनंद आणि अश्रू