@ महेश :
लिहिताना होवो व व्हावे हे दोन्ही शब्द सुचले होते. कोणता वापरावा ह्यावर बराच विचारही केला. विचारांती असे वाटले की व्हावेपेक्षा होवोत अधिक जोर आहे. म्हणजे व्हावेने इच्छा व्यक्त होत असेल तर होवोने तीव्र इच्छा सूचित होते. ह्या शेराच्या संदर्भात 'ते हेमपूजक मिडास होऊ देत' असा तळतळाट, किंबहुना काहीशी इच्छावजा शापवाणी व्यक्त करायची होती. त्यामुळे अखेर 'होवो' निवडला. ही अर्थच्छटा बरोबर आहे की केवळ माझा कल्पनाविलास हे भाषातज्ज्ञ सांगू शकतील. 'व्हावे' ला पसंती देण्यामागचे तुमचे ( व इतर वाचकांचे) विचार जाणून घायला आवडेल.