प्रकाशनविश्व या नावाचे़ एक वार्षिक आहे. दर वर्षी जानेवारीत छापून विक्रीसाठी तयार असते. (किंमत २००८ सालापर्यंत १०० रुपये होती, आता थोडी वाढली असावी.)त्यांत आधीच्या डिसेंबरमध्ये संपलेल्या संपूर्ण वर्षात प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांची यादी असते. लेखक-प्रकाशक-ग्रंथविक्रेते-नियतकालिके-छापखाने-चित्रकार-व्याख्याते-व्याख्यानमाला-शैक्षणिक संस्था इत्यादींची इत्थंभूत माहिती आणि बृहन्महाराष्ट्रातील साहित्यसंस्था, साहित्याला पारितोषिके देणाऱ्या संस्था-व्यक्ती यांचे़ पत्तेही 'प्रकाशनविश्वा'त असतात. शिवाय अनुवादक आणि मुद्रितशोधन करणाऱ्या लोकांची एक छोटीशी ज़ंत्री असते. वार्षिकाच़ा अन्य तपशील :
प्रकाशनविश्व,
संकलक/संपादक मोहन वसंत वैद्य,
सी-१२, हर्षदा गार्डन,
महागणेश कॉलनी,
पौड रोड,
कोथरूड,
पुणे ४११०३८.
दूरध्वनी : ०२०-२५३८३१९०.
---अद्वैतुल्लाखान
च़ छ़ ञ़ च़ा च़ै च़ि च़ौ चु़ चे़ च़ा च़ी