बातमीतल्या तज्ज्ञमंडळींशी पूर्णपणे सहमत. विज्ञान मराठीतून शिकवणे, तिथले पारिभाषिक शब्द मराठीत आणण्याचाशब्दाचाच अर्थ ध्यानात न घेता ते मराठीत आणण्याचा प्रयत्न करतो. त्या त्या विषयाची जी परिभाषा (जार्गन म्हणू या थोडक्यात) ठरून गेली आहे, ते शब्द तसेच ठेवून इतर वाक्य मराठीतून लिहायला गेल्यास विज्ञान खूप सोप्पं होईल. मुलं खूप आनंदी होतील, आनंदानं छान शिकतील बघा. आता गंधकाम्ल नकोच. त्याऐवजी सल्फ्युरिक एसिडचा काय परिणाम होतो तेच शिकवलं पाहिजे.