आपल्या गूगल डॉक्स गृहपृष्ठावर आपल्या, व आपल्याशी इतरांनी 'शेअर' केलेल्या फाईल्सची यादी असते. प्रत्येक फाईल-नावाच्या डाव्या बाजूस तिला निवडण्याची चौकट असते. चौकटीत टिचकी मारून हवी ती/हव्या त्या फाईल्स निवडावी/व्या. मग वरील टास्कबारमधील 'Share'च्या ड्रॉप-डाऊन त्रिकोणावर टिचकी मारून ड्रॉप-डाऊन मेन्यूतील 'Invite people...' निवडावे. तसे केल्यावर खाली दाखवलेली उपखिडकी उघडेल.
ज्यांच्याशी ती फाईल 'शेअर' करायची असेल त्यांचा/चे ई-मेल पत्ता/त्ते 'Invite' चौकटीत घालावे. ते 'Choose from contacts' वर टिचकी मारून तुमच्या कॉंटॅक्ट्स मधूनही निवडता येतील. संपादनाचे अधिकार द्यायचे असल्यास 'To edit' हा पर्याय निवडावा. ('To view' निवडल्यास इतरांना तुमची फाईल उघडता येईल, वाचता येईल पण त्यात बदल करता येणार नाहीत.