आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

चित्रपटाच्या दृश्यभाषेविषयी खूप बोललं/लिहीलं गेलं असलं, तरी जेव्हा आशय गुंतागुंतीचा वा काही निश्चित विचार मांडणारा असतो, तेव्हा चित्रपटांनाही संवादाचा आधार घेण्यावाचून पर्याय नसतो. आणि दिग्दर्शकाच्या दृष्टीने त्यात कमीपणा काहीच नाही. ध्वनी, मग तो साऊंड इफेक्ट्स स्वरूपातला असेल, पार्श्वसंगीताने दृश्याला उठाव आणणारा असेल वा प्रत्यक्ष संवादामधून येणारा असेल, चित्रपटाचा अविभाज्य भाग आहे. जेव्हा त्याची गरज असेल तेव्हा तो योग्य प्रकारे वापऱणं आवश्यक आहे. याचीच दुसरी बाजू म्हणजे अतिरेक, जो टाळताच यायला हवा. जसा संवादाचा अतिरेक वाईट, तसाच तो ...
पुढे वाचा. : व्हाईट रिबनः न उलगडणा-या रहस्याचा पाठपुरावा