शब्दाचाच अर्थ ध्यानात न घेता ते मराठीत आणण्याचा प्रयत्न करतो. कोण असे करतो? विद्यार्थी, शिक्षक की तज्ज्ञ? आणि गंधकाम्ल म्हणणे फार अवघड आहे? आज अनेक पिढ्या गंधकाम्ल वापरात आहे, ते सोडून सल्फ्युरिक ए(?)सिडचा परिणाम शिकवायचा? इंग्रजी तांत्रिक शब्दांत इतकी जोडाक्षरे असतात की ते शब्द मराठीत शुद्ध रीतीने लिहिणे विद्यार्थ्यांना कठीण जाते. विज्ञानासाठी इंग्रजी शब्द वापरायचे म्हणजे मराठी पारिभाषिक शब्द बनवायची गेल्या शंभर वर्षांची मेहनत वाया घालवायची.
इतर कुठल्या देशाने परक्या भाषेतले पारिभाषिक शब्द शाळकरी स्तरावरच्या शिक्षणासाठी स्वीकारले आहेत? शोध घ्यावा आणि मग लिहावे.--अद्वैतुल्लाखान