माझी भटकंती येथे हे वाचायला मिळाले:
’रानभूल’ हा शब्द आजवर अनेक जंगलाबद्दल लिहिलेल्या बर्याच खर्या आणि कल्पित कथांमध्ये भेटलाय..पण त्याआधी भेटलंय ते त्यातलं गडद, किर्र करणार जंगल....त्यामुळे आपण हा प्रकार फ़क्त पुस्तकातच अनुभवणार किंवा खरं तर असं काही नसेल अशा काही भाबड्या समजुतीत असतानाच एका मान्सुनमध्ये बी.एन.एच.एस.चा सिलोंडा ट्रेल जाहिर झाला...बी.एन.एच.एस.वाले प्रत्येक पावसाळ्यात एकदा तरी सिलोंड्यात घेऊन जातात त्यामुळे इतर वेळी वनखात्याच्या परवानगीशिवाय न जाणार्या विभागात जायला मिळतं शिवाय पावसाळ्यात सिलोंडयातले तिन्ही ओढे मस्त वाहात असतात, सगळीकडे गर्द हिरवाई पसरली असते ...