मोहित हे प्रयोजक मोहयति चे कर्म. भू. धा. वि. आहे.

संस्कृत व्याकरणाच्या (पंचवीसतीस वर्षांपूर्वी शाळेत वरवरचे शिकून नंतर विसरून गेलेल्या अतिप्राथमिक अभ्यासाखेरीज अधिक) अभ्यासाअभावी हा भाग नीटसा कळला नाही. कृपया स्पष्ट करू शकाल काय?

तरी प्रयोजक - कॉज़ेटिव असा प्रवास करतकरत अधिक विकीशोध घेतला असता प्रयोजक म्हणजे काय असावे याचा अंदाज आला असे वाटते. पण खात्री नाही.  (अज्ञानाबद्दल / अर्धवट ज्ञानाबद्दल क्षमस्व.) कृपया यावर अधिक प्रकाश टाकू शकाल काय? आभारी आहे. ('मोहयति'मागील मूळ धातू कोणता? 'मोहय्'? अर्थात हा केवळ आधीच्या विकीदुव्यावरील एका विभागाच्या वरवरच्या वाचनावरूनचा माझा इन्स्टंट अंदाज - चूभूद्याघ्या!)

खुष्क आणि शुष्क, मादर, मातर, मातृ,मदर,पाद्री, फादर, पितृ, बिरादरी, (बिऱ्हाड? ) ब्रदर, भ्रातृ, अशा अनेक गंमती आहेत.

अशीच एकच इंडोयुरोपियन मूळ असलेल्या गरम-घर्म-घाम-thermबद्दलचीही गंमत (श्रवणभक्तीने) ऐकलेली आहे. (ही 'हॉट लिस्ट' याहून बरीच मोठी आहे असे वाटते. तूर्तास एवढीच आठवली. बहुधा warmसुद्धा यात येते असे वाटते. चूभूद्याघ्या.)