एखाद्या धातूचे प्रयोजक करायचे असले की त्या धातूच्या मूळ रूपाला दहाव्या गणाचे अय हे विकरण लावून तो धातू जणू दहाव्या गणातला आहे असे गृहीत धरून त्याची रूपे करतात. मुह्(मुह्यति--चौथा गण) अर्थ : मोहित होणे, चुकणे, गाफ़ील असणे वगैरे. क. भू. धा. वि.: मूढ-मुग्ध(दोघांचे संस्कृत अर्थ सारखे, मराठीत वेगवेगळे. ) प्रयोजक(=प्रेरणार्थक) मोहय(अर्थ : मोहित करणे, चुकविणे, गाफ़ील ठेवणे) रूपे: मोहयति-मोहयते अशी होणार. त्याचे क. भू. धा. वि.: मोहित . मुग्ध=मोहित झालेला(भुरळ पडलेला). मोहित=मोहित केलेला(भुरळ घातलेला).
मराठी -हिंदीतली अशी उदाहरणेः मरणे-मारणे(प्रथम प्रयोजक)-मारविणे(द्वितीय प्रयो.); खाना-खिलाना(प्रथम प्रेरणार्थक)-खिलवाना(द्वितीय प्रेरणार्थक); काटना-कटाना-कटवाना; रोकना-रुकाना-रुकवाना.--अद्वैतुल्लाखान