स्वल्पविरामाचे मराठीसाठीचे आणि इंग्रजीसाठीचे नियम सारखे असलेच पाहिजेत असे नाही. उदाहरणार्थ , 'की' नंतर स्वल्पविराम की आधी? नियम असे : (१) 'की'च्या आधीचा वाक्यांश महत्त्वाचा असेल तर 'की' अगोदर नाहीतर 'की'नंतर स्वल्पविराम द्यावा. (२) 'की'च्या ऐवजी 'ल्यावर', 'तेव्हा', 'किंवा', 'ताना' आदी वापरता आले तर (कीआधी किंवा नंतरही) स्वल्पविराम नको. (३), (४) वगैरे.
पोचलांत की मला फोन करा.>पोचल्यावर मला फोन करा. >की ऐवजी ल्यावर चालते, म्हणून स्वल्पविराम नको. तू की(=किंवा) मी? इ.इ.
(१)त्यांनी सांगितले की, पोहायला जाऊ नकोस. 'पोहायला जाऊ नकोस' महत्त्वाचे, म्हणून 'की'नंतर विरामचिन्ह. (२) त्यांनीच सांगितले, की पोहायला जा म्हणून. 'त्यांनीच सांगितले' महत्त्वाचे, म्हणून 'की'आधी स्वल्पविराम. हा 'की' इंग्रजीत नाही, म्हणून त्यासाठी हे नियम नाहीत.
पत्त्यातल्या प्रत्येक ओळीनंतर स्वल्पविराम द्यावयाचा ही ब्रिटिश पद्धत, द्यायचा नाही ही अमेरिकन. उडदामाजी काळे गोरे काय निवडावे, निवडणारे(निवडणाऱ्यांनी)? ज्याला जी पद्धत योग्य वाटेल त्याने ती स्वीकारावी.
एकूण काय, आपण विरामचिन्हे इंग्रजीतून घेतली असली तरी नियम सारखेच असले पाहिजेत असे नाही.--अद्वैतुल्लाखान