जाणत्या त्या विहरी वेली

आणि

शब्दार्थ -
विहरी - विहरण करतात

अच्छा, असे आहे होय! स्पष्टीकरण वाचण्याअगोदर 'विहरी' हा शब्द (कविताचालकपरवाना वापरून) 'विहिरी' अशा अर्थाने वापरला असावा असे वाटले. विशेष करून त्यापुढचा 'वेली' ('वेल'चे अनेकवचन अशा अर्थी) हा शब्द पाहून.

विकुहरातील बनुनी छाया

सूर्यावर गुहा असतात? डागांबद्दल ऐकले होते.

(अर्थात, एकही अक्षर कळू नये हाच जर हेतू असेल तर डाग काय आणि गुहा काय, फरक काय पडतो म्हणा!)

रसावुनी मग येई रावा
रुभूमीकणघृत रगडाया

पण पोपट तर हिरवा असतो! ग्रीन मूव्हमेंट (मराठी?) आणि पेट्रोलियम एक्स्प्लोरेशन (पुन्हा, मराठी?) यांचा संबंध - असलाच तर - व्यस्त असावा असे समजत होतो. पोपट कशाला वाळूचे कण रगडून तेल गाळायला येईल?

की हिरवा रंग हे डॉलरचे - पर्यायाने अमेरिकेचे - प्रतीक आहे? पण पोपटाचा हिरवा रंग आणि डॉलरचा हिरवा रंग हे वेगवेगळे असतात हो! (कधी पोपट आणि डॉलर हे दोन्ही पाहिले असल्यास - दोन्ही एकाच वेळी पाहण्याची गरज नाही - हे लक्षात यायला हरकत नसावी.)

बरे, हिरवा रंग हे इस्लामचे प्रतीक म्हणावे, तर जेथे खनिजतेल देणारी मरुभूमी आहे तेथे बहुतकरून (काही थोडे अपवाद वगळता) इस्लामचा प्रभाव आहे हे जरी मानले, तरी मग बाकीच्या कवितेचा काही अर्थ (असेल तर) लागत नाही. म्हणजे डॉलरच असावा.

आणि या मरुभूमीकणघृताचा अगोदरच्या कडव्यातील विहिरी-वेलींशी काही संबंध आहे काय?

राहता राहिले पहिले कडवे.

काएकी कुठून कैशी
ल्लोळातुन उमटे ऐशी
हीन स्वरांची शुभ्र रेष ती

पुढची कडवी विचारात घेता ही बहुधा क्षेपणास्त्रे असावीत काय? की 'आकाशात् पतितं बॉम्बम्'?

एकंदरीत छुपी अमेरिकाविरोधी कविता वाटली. आणि "एकही अक्षर समजल नाही" ही शुद्ध पळवाट वाटली. आवडली नाही.

मात्र रचना नादमधुर आहे हं!