सविस्तर माहितीबद्दल मनापासून आभारी आहे.
याचप्रमाणे 'दह्' = 'जळणे' असावे काय? त्याचे प्रयोजक ('जाळणे') काय होईल? 'दाहय'? आणि मग 'दग्ध' म्हणजे 'जळलेला' असावा काय? 'जाळलेला' काय होईल? 'दाहित'?
'नैनं दहति पावकः' याचा नेमका अर्थ कसा लावावा? 'याला अग्नी जळत नाही'? येथे 'दाहयति' अशासारखे काही रूप का होत नाही? (तसेच 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि'बद्दल.)