या शब्दाचे मूळ काय? चहाचा कप (खरे म्हणजे उच्चारी 'कोप्प'... गेले ते दिन गेले) साहेबाच्या भाषेतून जसाच्या तसा आला. पण त्याची ही सोबतीण मात्र इथलीच असावी असा अंदाज आहे. कारण कपबशी सारखा पेलाबशी हाही शब्द कानावरून गेलेला आहे. 
त्यामुळे या शब्दाबद्दल फारच कुतूहल उत्पन्न झाले आहे. कोणी खुलासा करू शकेल का?
वर दुहितृ या शब्दावरची चर्चा वाचायला मिळाली ती खूपच मनोरंजक होती. मोनियर विल्यम्स यांच्या शब्दकोशात दुहितृ = 'a daughter who draws milk from her mother' अशी व्युत्पत्ती सापडल्यामुळे या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. पण संस्कृत भाषेत एकाच शब्दाची व्युत्पत्ती एकापेक्षा जास्त पद्धतीनेही करता येते. मी ऐकलेली 'दूरे हिता सा दुहिता' ही व्युत्पत्ती एका संस्कृत विद्वानांनी एका व्याख्यानात सांगितली होती. आता तिला संस्कृतग्रंथात काही आधार आहे का याचा शोध घेणे सुरू आहे. माझ्या म्हणण्याला काही आधार मिळाला तर इथे नक्की देईन. 

--अदिती