Paresh Prabhu Online येथे हे वाचायला मिळाले:
पणजी महानगरपालिकेचा पांढरा हत्ती आता प्रचंड करवाढीद्वारे आम आदमीला पायदळी तुडवायला निघाला आहे. विविध आस्थापनांच्या करांमध्ये केली गेलेली भरमसाट वाढ शेवटी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशालाच भुर्दंड घालणार आहे. एकीकडे घरपट्टी आणि करवसुलीबाबतची प्रचंड अनास्था, दुसरीकडे विकासकामांच्या आघाडीवरची सामसूम आणि तरीही अशा प्रकारे अव्वाच्या सव्वा करवाढ करून महापालिका मंडळाने आपल्या मनमानीपणाचेच दर्शन पुन्हा एकदा घडवले आहे. पेट्रोल पंप, चित्रपटगृहे, हॉस्पिटल, दुकाने यांच्याकडून वाढीव कर आकारणी करणे म्हणजेच शेवटी जनतेच्या खिशातून हे पैसे वसूल करणे आहे. ...