भोमेकाका धन्यवाद! बुद्धिप्रामाण्य, इहवाद, विज्ञाननिष्ठा, शून्यवाद, निरर्थकवाद, अस्तित्ववाद इ. बद्दल स्वतंत्र विचारधारा म्हणून मला आदरच आहे. मात्र ही मंडळी वैदिक धर्मातील गाभा समजून न घेताच एखाद्या पोटभरू पुरोहित, किंवा बुवा बाबाला झोडपून काढत 'जितम मया' या थाटात सगळ्या परंपरा भोंगळ आहेत, श्रद्धा या अंधश्रद्धा आहेत असा टोकाचा, एकांगी विचार सातत्याने मांडतात तेव्हा तो पटत नाही.

श्रद्धावान व्यक्तीला दुर्बळ समजणे, कुठलेही धार्मिक कृत्य भीतीपोटीच केले जाते असे गृहीत धरणे  हे साफ चूक आहे. सत्प्रव्रुत्त व्यक्तीचा बुद्धिभेद करून काय साध्य होणार आहे हे समजत नाही.