लेख छान आहे, पण यांत नवीन काय सांगितले? सर्वांना आधीच माहीत असलेल्या गोष्टी पुन्हापुन्हा सांगण्यात काही अर्थ नाही. सरकारने असे अनेक परिभाषिक कोश (बहुधा एकतीस) आत्तापर्यंत प्रसिद्ध केले आहेत. पण सध्या कोणत्या कोशावर काम चालू आहे, याची काहीच माहिती लेखात सापडली नाही. आणखी किती कोश काढण्याचा इरादा आहे, ही माहिती लेखात हवी होती.
सध्या हे कोश फक्त शासकीय ग्रंथालयांत(म्हणजे मुंबईत चौपाटीसमोर तारापोरवाला मत्स्यालयाशेजारी) आणि पुण्यात फोटो झिंको प्रेस येथेच मिळतात. कायदे आणि काही खास अधिनियम यांची पुस्तके गिरगांवात प्रिन्सेस स्ट्रीटजवळ. तेथेही बहुतेक पुस्तकांच्या प्रती संपलेल्या असतात. ही पुस्तके जर बाजारात मिळतच नसतील तर छापल्याने सामान्य जनतेचा काही फायदा होतो असे वाटत नाही. इंडियन पीनल कोड, सिव्हिल प्रोसीजर कोड आणि क्रिमिनल प्रोसीजर कोड यांसारख्या कायद्याच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद थॉमस कॅंडीने सन १८६० च्या सुमारास केले. त्यांत किरकोळ बदल करण्याव्यतिरिक आपल्या सरकारने काही जास्त केले असेल असे वाटत नाही. नवीन कायद्यांची पुस्तके-उदा. संपत्ती हस्तांतरण अधिनियम, महाराष्ट्र विक्री कर कायदा असली काही किरकोळ पुस्तके सरकारने प्रसृत केली आहेत; इतके असूनही फक्त इंग्रजी पुस्तके अधिकृत समजली जातात, कारण विधेयक मुळात इंग्रजीत लिहिले गेलेले असते.
अवांतर पण महत्त्वाचे : जालावर कोशांची आणि अन्य प्रकाशनांची साधी यादी उपलब्ध नाही, तर कोश कसे असतील? हे कोश
पुस्तकांच्या दुकानांतही मिळत नाहीत. क्वचित एखाद्या पुस्तक प्रदर्शनात दिसतात.(चू.भू.द्या.घ्या.)--अद्वैतुल्लाखान